सोलापूर – प्रा. श्रीराम पुजारी जन्मशताब्दी निमित्त श्री हिराचंद नेमचंद वाचनालय व प्रा. श्रीराम पुजारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि 25 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता स्व. श्रीराम पुजारी यांच्या जीवनावर आधारित चित्रफितीचे उदघाटन देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ‘माझ्या आठवणीतले पुजारी सर’ या विषयावर सुशीलकुमार शिंदे, सुप्रसिध्द चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक जब्बार पटेल, ख्यातनाम संगणक तज्ञ, विचारवंत व लेखक अच्युत गोडबोले आपले मनोगत व्यक्त करणार आहेत हा कार्यक्रम लोकमान्य टिळक सभागृहात होणार आहे.




शनिवार दिनांक 26 जुलै 2025 रोजी किर्लोस्कर सभागृहात सायंकाळी 5:30 वाजता आदरासली झाकीर हुसेन यांना श्रध्दांजली स्वरुपात यशवंत वैष्णव आणि सुखद मुंडे यांची तबला व पखवाज जुगलबंदी होणार आहे. यावेळी लेहरा अभिषेक शिनकर धरणार आहेत. दुस-या सत्रात ख्यातनाम गायक कैवल्यकुमार गुरव यांचे संध्याकाळी 6.45 वाजता शास्त्रीय गायन होईल.




रविवार दिनांक 27 जुलै 2025 रोजी किर्लोस्कर सभागृहात संध्याकाळी 5.30 वाजता पं. प्रवीण गोडखिंडी (धारवाड) यांचे बासरी वादन आयोजित करण्यात आले असून त्यांना तबल्यावर यशवंत वैष्णव साथ देणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 6.45 वाजता विदुषी सुप्रसिध्द गायिका कलापिनी कोमकली यांचे शास्त्रीय गायन होणार असून त्यांना संवादिनीवर अभिषेक शिनकर व मयंक बेडेकर तबल्यावर साथ देणार आहेत. सर्व कार्यक्रम सर्वासाठी खुले आहेत. तरी सर्व रसिक श्रोत्यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन श्रीराम पुजारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रकाश जोशी, कार्याध्यक्ष डॉ. नवनीत तोष्णीवाल, सचिव ललिता दातार तसेच श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत कामतकर, प्रमुख कार्यवाह डॉ. नभा काकडे, व कार्यवाह दत्ता गायकवाड यांनी केले आहे.