सोलापूर : खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिपायांची पदभरती बंद केल्याने राज्यातील खासगी संस्थांमधील तब्बल २५ हजार जागा कायमच्या रद्द झाल्या आहेत. दुसरीकडे २०२३-२४ च्या संचमान्यतेनुसार लिपिक संवर्गातील पदे व प्रयोगशाळा सहाय्यक, अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहा हजार जागा भरल्या जाणार असून त्यासंबंधीचा शासन निर्णय निघाला आहे. पण, सरळसेवेतून या जागा भरण्याचा अधिकार संस्था चालकांना देण्यात आला आहे.शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. आकृतिबंध निश्चित नसल्याने सहा ते सात वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झाली नव्हती. आता तो आकृतिबंध निश्चित करून २०२३-२४ च्या संचमान्यतेवरून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती होणार आहे. एकूण मंजूर पदांपैकी ८० टक्के पदभरती करता येणार आहे. पण, सध्याचा संस्थांमधील कार्यरत शिपाई सेवानिवृत्त झाल्यावर त्याठिकाणी अनुदानित तत्त्वावर शिपाई भरता येणार नाही. दुसरीकडे जो शिपाई पदोन्नतीसाठी पात्र आहे, त्याची पदोन्नती झाल्यावर रिक्त पदावर नवीन शिपाई भरता येणार नाही असे निर्बंध शिक्षण विभागाने घातले आहेत.
शिक्षकेतर कर्मचायांची पदभरती
लिपिक संवर्ग : ४४७०
प्रयोगशाळा सहाय्यक :१,५३०
तत्त्वावरील शिपाई हे हे पद कायमचे रद्द करण्यात आले आहे. अनुदानित शैक्षणिक संस्थांना शासनाकडून मिळणाऱ्या वेतनेतर अनुदानातून शिपाई भरता येईल. पण शिपाई पदभरतीवेळी त्याच्याकडून पुढे कायमची मागणी करणार नाही, असे हमीपत्र घेणे बंधनकारक आहे.
- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर