सोलापूर जिल्ह्याला नियोजन समितीमधून म्हणजेच डीपीसी मधून किती कोटी रुपये मिळणार याकडे जिल्हा वासियांचे तसेच लोकप्रतिनिधींचे लक्ष लागले आहे पुण्यात आज पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्याची उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार बैठक घेणार असून जिल्ह्याने पाठविलेले आराखडे यामध्ये मंजूर होणार आहेत. हे आराखडे राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर केले जातात. सर्व जिल्ह्यांचे आराखडे मंजूर झाल्यानंतर अजित पवार पुण्यात पत्रकार परिषद घेऊन याची माहिती देणार आहेत. तसेच सोलापूर जिल्हा वार्षिक योजना सन 2021- 22 या आर्थिक वर्षासाठी 349 कोटी 87 लखाचा आराखडा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 23 जानेवारी रोजी मंजूर झाला आहे त्यानंतर आता पुणे विभागात होणाऱ्या या बैठकीत यावर अंतिम मंजुरी होणार आहे.