पुणे : विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीने सरशी केली आहे. दोन जागांवर विजय तसेच दोन जागांवर आघाडी घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा विजय एकत्र काम केल्यामुळं मिळालेला विजय असल्याचं म्हटलं आहे.
पवार म्हणाले की, गेल्या वर्षभर काम करून दाखवलं आहे. यामध्ये मुख्यतः नागपूरची जागा कधीच मिळाली नव्हती तो गड कॉंग्रेसने जिंकला. हा महाराष्ट्रातील निकाल महाविकास आघाडीचा विजय आहे. महाविकास आघाडी सरकारने एकत्र काम केलं त्याचं यश आहे. पुणे मतदारसंघातही आम्हाला यश मिळवता आलं नव्हतं. मात्र आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकास आघाडी सरकारला स्वीकारलं आहे. आजपर्यंत ज्यांना स्वीकारलं त्यापेक्षा वेगळा निकाल आलाय. महाराष्ट्रातील चित्र बदलते आहे. सर्व उमेदवाराचे अभिनंदन करतो जनतेच आभार अशा शब्दात त्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केलं आहे. धुळे, नंदुरबार विधानपरिषदेचा निकाल हा अजिबात आश्चर्यकारक नाही. निर्वाचित होते तेच त्यांच्या हाती मोठा वर्ग पूर्वी होता. हा त्यांचा तो खरा विजय नाही, असं शरद पवार म्हणाले.