सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दक्षिण सोलापूर विधानसभा संवाद मेळावा आज माजी मंत्री आ. सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर संवाद साधून मोलाचे मार्गदर्शन केले.
आगामी लोकसभा निवडणूक ही भाजपासाठीच नाही, तर देशाच्या भविष्यासाठीही महत्त्वाची आहे. त्यामुळे भाजपाच्या प्रत्येक घटकाने आपलं योगदान द्यावे आणि पंतप्रधान मा. मोदीजींना पंतप्रधान करताना सोलापूर लोकसभेचे एक मत मोदीजींच्या पारड्यात पडावे, यासाठी एकजूटीने लढण्याचे आवाहन सुभाष बापू देशमुख यांनी यावेळी केले.
याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, जिल्हा सरचिटणीस मनीषभैय्या देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, जिल्हा उपाध्यक्ष मळशिद्ध मुगळे, तालुका अध्यक्ष रामकाका जाधव, तालुका अध्यक्ष अर्जुन जाधव, मंडळ अध्यक्ष आनंद बिराजदार, तालुका अध्यक्ष संगप्पा केरके, नियोजन स. सदस्य डॉ. चनगोंडा हविणाळे, निवडणूक प्रमुख हणमंत कुलकर्णी, शहर सरचिटणीस विशाल गायकवाड, विस्तारक शिवराज सरतापे, प्रदेश सचिव अर्चनाताई वडनाळ, महिला अध्यक्ष अंबिकाताई पाटील, महिला अध्यक्ष नीलिमाताई शितोळे, महिला अध्यक्ष निलीमा हिरेमठ तसेच अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.