शनिवारी जुनी मिल कंपाऊंड द स्क्वेअर मॉल पहिला मजला या ठिकाणी राष्ट्रवादी भवन कार्यालयात नूतन जम्बो कार्यकारणीस नियुक्तीपत्र प्रदान सोहळा कार्यक्रम जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली या नियुक्त्या संपन्न झाला. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या फोटोस पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
सुरुवातीला व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला. व्यासपीठावर आमदार यशवंत माने, जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान,
माजी आमदार रविकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव , मा. गटनेते आनंद चंदनशिवे,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ,ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, श्रीनिवास कोंडी,सुभाष डांगे, सेवा दल अध्यक्ष प्रकाश जाधव,गणेश पुजारी बिज्जू प्रधाने,महिला शहराध्यक्ष संगीता जोगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम,फारुख मटके, डॉ. बसवराज बगले, खलील शेख, अमीर शेख, पवन कुमार पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या सत्कार समारंभ नंतर नूतन पदाधिकाऱ्यांना आमदार यशवंत माने यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
सुरुवातीलाच कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी प्रास्ताविक केल. यानंतर ज्येष्ठ नेते श्रीनिवास कोंडी, मा. रविकांत पाटील महिला शहराध्यक्ष संगीता जोगधनकर, आनंद चंदनशिवे, किसन जाधव, जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी आपल्या भाषणात नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यानंतर कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक अध्यक्ष आमदार यशवंत माने यांनी आपल्या भाषणात नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तर नंतर होळीच्या सोलापूर शहरवासीयांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दादांनी विकासाच्या दृष्टीने निर्णय घेतला आणि विकासाचा माणूस म्हणून दादांची ओळख महाराष्ट्रात विशेष परिचित आहे. पक्ष संघटनेत जो प्रामाणिक काम करतो त्याची विशेष दखल राष्ट्रीय अध्यक्ष आधारवड राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार घेत असतात त्यामुळे एकनिष्ठेने प्रामाणिकपणे येणाऱ्या काळात पक्ष संघटन वाढीसाठी आणि अजित दादांचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेणे आवश्यक आहे असा कानमंत्र यावेळी पदाधिकाऱ्यांना दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधील प्रत्येक कार्यकर्त्यांची कामे जलद गतीने मार्गी लागतील. महायुती सरकारमध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहोत याची आठवण यावेळी आमदार यशवंत माने यांनी कार्यकर्त्यांना करून दिली.
घड्याळ व हे कायमस्वरूपी आपल्याकडेच आहे. याचीही जाणीव करून दिली. जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी राष्ट्रवादीच्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांसाठी विविध सेवा सुविधा आणि स्वतंत्र विभागाच्या कार्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले ते जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवन या प्रशस्त कार्यालयातून विशेषतः दिसून येतं. असे कार्यालय हे राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात होणे आवश्यक असून हे राष्ट्रवादी भवन अधिक प्रशस्त आहे याच धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रात असे कार्यालय होण्यासाठी आपण राज्यस्तरावर विशेष प्रयत्न करू आणि ते कार्यालय प्रत्यक्षात साकारूही असेही प्रतिपादन आमदार यशवंत माने यांनी केले.
याप्रसंगी बसवराज कोळी, वैभव गंगणे, सोमनाथ शिंदे, अल मेहराज आबादी राजे, सूर्यकांत मुसळी, धनंजय जाधव, किरण पाठक, आशिष म्हैत्रे , शामराव गांगर्डे, तनवीर गुलजार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांनी मानले.