सोलापूर – केंद शासनाच्या विविध योजनांचा सविस्तर आढावा जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीत खासदार प्रणिती शिंदे यांनी सर्व संबंधित शासकीय विभाग प्रमुखांनी केंद्र शासनाच्या लोककल्याणकारी योजनापासून जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही या दृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या.
नियोजन भवन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) च्या बैठकीस खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर,आमदार सुभाष देशमुख, आमदार अभिजित पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्या सह सर्व संबंधित शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, धाराशिव चे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार अभिजित पाटील यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमबजावणी होण्यासाठी विविध सूचना मांडल्या तसेच समस्याही मांडून त्या प्रशासनाने त्वरित सोडवण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी अशी मागणी केली.
प्रारंभी केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी आपापल्या विभागांतर्गत सुरू असलेल्या योजनांची माहिती व सद्यस्थिती बैठकीत सादर केली. दिशा समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांकडून केंद्र शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करून शेवटच्या घटकापर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
#solapurNews #yesnewsmarathi #solapur #pranitishinde #OmrajeNimbalkar #kumaraashirvad