प्रिसिजन फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रिसिजन प्रीमियर लीग या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धा दि. २५ सप्टेंबर, ०२ ऑकटोबर आणि २३ ऑकटोबर २०२४ या कालावधीत सेंट्रल रेल्वेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर संपन्न झाल्या. स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी होते. दिनांक २३ ऑक्टोंबर २०२४ रोजी सेमी फायनल व फायनल मॅच झाल्या.
पहिली सेमीफायनल मॅच फौंड्री लॉयन्स विरुद्ध
मशीन शॉप रॉयल स्टायकर दुसरी सेमीफायनल मॅच मशीन शॉप ब्लास्टर्स विरुद्ध फौंड्री कॅपिटल अशा झाल्या त्यातून फौंड्री लायन्स व मशीन शॉप ब्लास्टर्स या दोन्ही टीम मध्ये अंतिम सामना झाला. फौंड्री ४ लायन्स संघाने ५२ धावांचे आव्हान मशीन शॉप ब्लास्टर्स टीम समोर ठेवले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या मॅच मध्ये ०९ विक्ट्सनी मशीन शॉप २ ब्लास्टर्सने हा अंतिम सामना जिंकला.
या स्पर्धेमध्ये विजेता संघास मानाची प्रिसिजन ट्रॉफी देऊन सन्मानती करण्यात आले. या लीगमध्ये अन्य ही भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली होती.
विजेता संघ- मशीन शॉप २ ब्लास्टर्स
फायनल रनर अप – फौंड्री ४ लायन्स
मॅन आफ द सिरिज- महेश फफागिरी ( मशीन शॉप २)
बेस्ट बॉलर – अनिल व्हटकर (फौंड्री ३)
बेस्ट बॅट्समन – प्रभाकर तड्डेनरू (मशीन शॉप १)
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रिसिजन कॅमशॉफ्ट लिमिटेडचे कार्यकारी संचालक करण शहा, मुख्य वित्तीय अधिकारी रवींद्र जोशी, चिदानंद मोंदडगी, दीपक कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाला.यावेळी सर्व १० संघ व संघ मालक उपस्थित होते.