सोलापूर : पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला, कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागाचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा हुतात्मा स्मृती मंदीर येथे पार पडला.
या कार्यक्रमासाठी जि. प. सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सरस्वती , नटराज व श्री मार्कंडेय महामुनीच्या प्रतिमेचे पूजनासह दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम, सर्वश्री विश्वस्त विजयकुमार गुल्लापल्ली, नागनाथ गंजी, श्रीधर चिट्याल, संगीता इंदापुरे, मधुकर कट्टा, गणेश गुज्जा, नागनाथ श्रीरामदास, रमेश बौद्धूल, अंबादास गज्जम, श्रीनिवास ईप्पाकायल तसेच कुचन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल निंबाळकर, भू. म. पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या गीता सादुल, उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामुल, बिटला प्रशालेच्या मुख्याध्यापिका शारदा गोरट्याल व माजी प्राचार्य मधुकर गवळी , रोटेरियन धनश्री केळकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविकेतून प्राचार्य युवराज मेटे यांनी प्रशालेतील वर्षभरात झालेल्या विविध उपक्रमांचे अहवाल वाचन आणि विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उत्तुंग यशाची माहिती दिली.पर्यवेक्षिका प्रणिता सामल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
प्रमुख पाहुणे सचिन जगताप यांनी कुचन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबाबत गौरवोद्गार काढले आणि विद्यार्थी हे देशाचे भावी सुजाण नागरिक बनावेत .अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी बनण्यासाठी जिद्द आणि चिकाटी अंगी बाळगावी तसेच मोबाईल आणि टीव्ही यापासून दूर रहावे आणि विविध कला जोपासावेत असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास क्यातम यांनी कुचन प्रशाला ही मातृशाखा असल्याने त्यातील होणारे सर्व शैक्षणिक घडामोडी या आदर्शवत असल्याचे सांगून कुचन प्रशालेच्या शैक्षणिक वाटचालीचे कौतुक केले. पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये उच्च ध्येय ठेवून ते प्राप्त करण्यासाठी अविरत मेहनत करावी आणि येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर सक्षमपणे मात करावी असे मत व्यक्त करत पारितोषिक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि स्नेहसंमेलनात सहभागी कलाकारांसाठी शुभेच्छा दिल्या.
कुचन प्रशालेच्या स्नेहसंमेलनामध्ये सादर करण्यात आलेल्या तेलुगु, मराठी आणि हिंदी भाषिक विविध गाण्यावर कलाकार विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याचे पालकांनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख कविता गेंगाणे यांनी तर पुरस्कार प्राप्त गुणवंत विद्यार्थी यादी वाचन बसवराज हिटनळ्ळी यांनी केले.तर आभार मधुकर धर्मसाले यांनी मानले .स्नेहसंमेलनाच्या निवेदनाचे कार्य सहशिक्षक संजीव बोरला,रूपाली कवडे,सपना मोरे , प्रियंका महिंद्रकर आणि अविनाश जतकर यांनी केले.या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, मल्लिकार्जून जोकारे , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.