तिऱ्हे – सालाबादप्रमाणे यावर्षी श्री म्हसोबा देवस्थानची यात्रा मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात मोठ्या सजावटीसह काठी मिरवणुक निघाली. परराज्यातून आणलेली वेगवेगळे सोंग हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. सकाळी दहा वाजता तिर्हे ग्रामपंचायत समोरून काठी मिरवणुकीला सुरुवात झाली व तेथून ढोल ताशा सह हलगी व नगाराचा कडकडाट निघाली. उद्या शनिवार कुस्ती मैदानाने दोन दिवस चालणाऱ्या यात्रेची सांगता होणार आहे.यात्रेसाठी नौकरी व्यवसाय निमित्ताने बाहेर असलेल्या लोक आवर्जून येतात.
या यात्रेसाठी तिर्हे पंचक्रोशीत बहुसंख्येने उपस्थित होते. श्री म्हसोबा यात्रा पंच कमिटी नवुदादा सुरवसे, हंसध्वज जाधव, शंकर जाधव, भास्कर बापु सुरवसे, हरी जाधव, किशोर जाधव, पार्थवीर बापू सुरवसे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सुरवसे, सरपंच नेताजी सुरवसे ,उपसरपंच मारुती लवटे, अजय सोनटक्के, गोवर्धन जगताप, अरविंद जाधव, शिवाजी काशीद, दत्तात्रय सुरवसे, दत्तात्रय आगलावे, प्रमोद खराडे,बंडु सासणे, इरफान पठाण, भारत घदुरे, आण्णा जावळे, विशाल जाधव, प्रदीप सुरवसे आदी उपस्थित होते.