जागतिक कॅन्सर दिवस विशेष
भारतात कॅन्सर चे प्रमाण वाढत आहे आणि महिलांमधील एक अत्यंत महत्त्वाचा कॅन्सर म्हणजे सर्वाइकल कॅन्सर. बऱ्याचशा मुली व महिला या मासिक पाळीच्या वेळी अशुद्ध कपड्यांच्या वापर करतात त्यामुळे जंतुसंसर्ग होऊन जननेंद्रियांमध्ये ‘इन्फर्टलीटी’ व ‘सर्वाइकल कॅन्सर’ चा धोका सुद्धा उद्भवतो.
आज बाजारात मिळणाऱ्या काही रेप्यूटेड सॅनिटरी पॅड मुळे सुद्धा कॅन्सरचा धोका हा वाढलेला आहे कारण त्यामध्ये काही विशिष्ट प्रकारची विषारी रासायनिक द्रव्यं असल्याने कर्करोगाचा धोका तसेच त्वचेची जळजळ , एलर्जी या समस्या वाढलेल्या आहेत. बाजारातील या काही सॅनिटरी नॅपकिन्समध्ये प्लास्टिकचे प्रमाण असल्यामुळे त्यामध्ये ‘डायॉक्सिन’ हा शोषक पदार्थ म्हणून वापरला जातो व हळूहळू हे शरीरामध्ये जमा होऊन गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे. डब्ल्यू एच ओ डायॉक्सिन ला प्रदूषक आणि कर्करोग मानते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा कमी होते. भारतातील जवळपास 80 टक्के महिला या अशा प्रकारच्या नॉनऑरगॅनिक सॅनिटरी पॅडचा वापर सध्या करीत आहेत. त्यामध्ये पॉली प्रॉपेलीन, पॉलीइथीलीन ,स्टाइरीन व ॲसिटोन यासारखी घातक रसायने असतात. त्यामध्ये 90 टक्के प्लास्टिक असते. हे आजकालच्या बऱ्याचशा शोधलेखांमध्ये स्पष्ट झाले आहे. शिवाय अशी सॅनेटरी नॅपकिन्स जाळल्या नंतर निर्माण होणाऱ्ये वायू सुद्धा वातावरणास धोकादायक असतात व असे पॅड जमिनीत पुरल्यानंतर ते शेकडो वर्षे विघटित न झाल्यामुळे जमिनीची सुपीकता सुद्धा नष्ट होते. या सॅनिटरी पॅडच्या कचऱ्यामुळे पॅड्स वापरणाऱ्या व्यक्तीबरोबरच , सफाई कर्मचारी व सामाजिक आरोग्य व पर्यावरण या सगळ्यांवरच विपरीत परिणाम होत आहे. अशा समस्यांपासून माहिती व सुटकारा मिळण्यासाठी राजस्थान सरकारने ‘उडान’ योजनेच्या माध्यमातून चांगल्या प्रतीची सॅनिटरी नॅपकिन्स मोफत देत आहे.
परंतु आता अशा प्लास्टिक मुक्त सॅनिटरी नॅपकिन्स ‘बेस्ट केअर सोल्युशन्स’ तर्फे बनवल्या जात असून त्या पर्यावरण पूरक, प्लास्टिक मुक्त व कॅन्सरच्या धोक्यापासून मुक्त सॅनिटरी नॅपकिन्स आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत. ही नॅपकिन्स वापरणाऱ्यांमध्ये त्वचेचे एलर्जी ,जळजळ असे विकार सुद्धा जाणवत नाहीत, तसेच या नवीन प्याडसच्या ९ लेअर्सच्या प्रोटेक्शन मुळे जास्त वेळ शोषून घेण्याची यामध्ये क्षमता आहे. नुकत्याच याचा वापर करणाऱ्या सर्व क्षेत्रातील महिलांच्या एका सर्वे मध्ये यांच्या क्षमतेबद्दल सर्वांनी अत्यंत चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.केवळ अज्ञानामुळे किंवा काही रुपयांची बचत करण्यामागे इन्फेक्शन किंवा सर्वाइकल कॅन्सर सारखे घातक रोग बळावून घेण्यापेक्षा या नवीन आलेल्या गोष्टींची माहिती करून त्याचा वापर करणे हीच आजच्या दिवशी महिलांना दिलेला सर्वात मोलाचा सल्ला आहे.
डॉ. डायना आडके.
आडके हॉस्पिटल , सोलापूर.
९८२२१७६७७२.