येस न्युज मराठी नेटवर्क : दोन चिमुकल्यांच्या भांडणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बुलडाणातील कळंबेश्वर, तालुका मेहकर येथील हा व्हिडीओ आहे. चिमुकल्यांमध्ये भांडणं होत असतात. त्या दोघांनी वापरलेले डायलॉग्ज व्हायरल होत आहेत. शंकरपाळ्या या शब्दावरुन हजारो मिम्स व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच गाजत आहे