गडचिरोली – कृषिमंत्री माणिकराव कोकाटे काय बोलले हे मी ऐकलेले नाही. मात्र, जर त्यांनी असे वक्तव्य केले असेल तर ते अतिशय चुकीचे आहे. पिक विमा संदर्भात आपण जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि त्याची पद्धती बदलली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
एक रुपयात पिक विमा योजना बंद करण्यात आली असून या संदर्भात स्पष्टिकरण देताना कोकाटे यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या आधी वाद झाला त्या वेळी मी शेतकऱ्यांना भिकारी म्हणालो नव्हतो तर शेतकऱ्यांकडून एक रुपया घेणारे शासनच भिकारी असल्याचे म्हटले होते, असे कोकाटे यांनी म्हटले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा कृषि मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केली.