येस न्युज नेटवर्क । भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या वन डे मालिकेचा पहिला सामना आज रविवार, 18 जुलै रोजी खेळला जाणार आहे. हा सामना कोलंबोमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल. नव्या दमाच्या टीम इंडियासमोर श्रीलंकेचं तगडं आव्हान असणार आहे. पहिल्यांदाच नॅशनल कोचची भूमिका पार पाडणाऱ्या राहुल द्रविड आणि नेतृत्व करणाऱ्या शिखर धवनची ही कसोटी असणार आहे.
भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी 3 तीन वाजता सुरु होईल. हा सामना आपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनलवर पाहू शकणार आहात. हे सामने या नेटवर्कवर आपण हिंदी आणि इंग्लिश कॉमेंट्रीसोबत पाहायला मिळेल. या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग सोनी लिव्ह अॅप आणि त्यांच्या वेबसाईटवर पाहू शकाल.