जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. सुट्टीचे दिवस वगळता 16 ते 21 जानेवारीपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत आहे . 22 जानेवारी रोजी प्राप्त अर्जांची छाननी होईल. 23 ते 27 जानेवारी पर्यंत नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची मुदत असणार आहे. 27 जानेवारी रोजी उमेदवारांची अंतिम यादी आणि चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. 5 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार असून सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

