सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र चित्रपट निर्माते मनोज कदम निर्मित चित्रपट जगप्रसिद्ध पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (PIFF) मध्ये बहुचर्चित “ग्लोबल आडगाव” या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्याचे भूमिपुत्र उद्योजक आणि चित्रपट निर्माते मनोज कदम यांचा “ग्लोबल आडगाव” खरोखरच ग्लोबल झाला. कोलकाता इंटरनॅशनल, अजंता एलोरा इंटरनॅशनल आणि अमेरिकेतील मराठी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये भरघोस यशानंतर अतिशय मानाचे फेस्टिवल PIFF मध्ये निवड झाल्याने ग्लोबल आडगाव टीमच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला मनोज कदम यांचे सिल्व्हरओक फिल्म्स अँड एन्टरटेन्मेंट तर्फे निर्मित हा चित्रपट चार वेळा अंतरराष्ट्रीय नामांकित फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. ६७२ कलाकारांचा भव्य सिनेमा “ग्लोबल आडगाव” सर्वत्र आपली चुणूक दाखवत आहे. या सिनेमाने प्रत्येक फेस्टिवलमध्ये प्रेक्षकांची व परिक्षकांची मने जिंकत खूप कौतुक मिळवले आहेच. अजंता एलोरा इंटरनॅशल ( AIFF international film festival ) मध्ये “ग्लोबल आडगाव चित्रपटासाठी प्रेक्षकांनी दोन्हीही शो हाऊसफुल्ल गर्दीत झाले, आणि भली मोठी रांग शिल्लक होती ज्यांना हा सिनेमा पाहायचा होता. या चित्रपटाचा निर्माता म्हणून भारत सरकारचा प्रथम राष्ट्रीय पुरस्कार विजेता उद्योजक जरी असलो तरी सर्वप्रथम मी शेतकऱ्याचा पुत्र आहे याचा अभिमान आहे आणि ही गोष्ट वाचलेली नाही तर अनुभवलेली आहे म्हणून हा एक तगडा सिनेमा संपूर्ण टीमच्या साथीने पूर्ण केला असे मत मनोज कदम यांनी व्यक्त केला.
या चित्रपटात महाराष्ट्रातील सर्व भागातील गुणी कलाकार तसेच प्रख्यात कलाकार सयाजी शिंदे उषा नाडकर्णी, अनिल नगरकर, उपेंद्र लिमये या कलाकारांसोबत सोलापूर जिल्ह्यातील फुलचंद नागटिळक, वैदेही कदम , स्नेहल कदम, डॉ. अर्चना कदम, अभिजित मोरे, सुखदेव मोरे, नयना मोरे यांना संधी दिली आहे. टेक्निकल टीम पुण्यातील आहे आणि पोस्ट प्रोडक्शनमधले बरेच काम पुणे येथे झाले. सोबत मुंबई कोलकाता येथील पण लोकांची साथ लाभली. आज पुणे येथील मराठमोळ्या महाराष्ट्र शासनाच्या PIFF ला निवड झाली हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. कोलकाता, औरंगाबाद आणि अमेरिकेतून झालेल्या कौतुकाचा आनंद तर आहेच पण आपल्याच राज्यातील हा होणारा फेस्टिवल आहे त्यामुळे घरातून मिळालेली कौतुकाची थाप खूप बळ देऊन जात आहे ही भावना पूर्ण टीमची आहे. यापुढेही मनोरंजनातून समाज प्रबोधन हा उद्देश समोर ठेऊन सिल्व्हरओक फिल्म्स अँड एन्टरटेन्मेंट असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मराठी, बंगाली असे बहुभाषिक चित्रपट निर्माण करण्याची ताकत मिळाली. ते ही अत्यंत अल्प कालावधीत. या फेस्टीव्हलमध्ये ग्लोबल आडगाव चित्रपटाची निवड होणे अमेरिकेतील फेस्टीव्हलमध्ये निवड झालेल्या आनंदापेक्षा फार मोठा आनंद आहे. कारण हा मान आपल्या राज्यातील म्हणजेच घरातून मिळालेला बहुमान आहे याचा आणि मी या चित्रपटाचा निर्माता म्हणून अतीव आनंद होत आहे अशी भावना निर्माते मनोज कदम यांनी व्यक्त केले. सुंदर कथा, लेखन, डॉ. अनिलकुमार साळवे यांचे दर्जेदार दिग्दर्शन, सृजनशील दिग्दर्शक सुरजित धर FTII पुणे, सहनिर्माते अमृत मराठे, टेक्निकल टीममध्ये पण सोलापूर जिल्ह्यातील Sound विकास खंदारे, makeup मंगेश गायकवाड, वेशभूषा समाधान सर्वगोड यांनी केले आहे. निर्माता मनोज कदम यांनी ग्लोबल आडगावची संपुर्ण टीम, आणि आमच्यावर प्रेम करणारे प्रेक्षक, हितचिंतक यांचे सर्वांचे अभिनंदन केले आहे. या सर्वांच्या सहकार्याने कोरोना काळात सर्वच अडचणी असताना ग्लोबल आडगाव सारखे शिवधनुष्य पेलले आणि आज हा चित्रपट नामांकित फेस्टिवल मध्ये चांगली कामगिरी करत आहे आणि करत राहील असेही ते पुढे म्हणाले.