सोलापूर : शहर युवक कॉंग्रेसची निवडणूक जाहीर झाली असून, १२ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या दरम्यान सदस्य नोंदणी व मतदान होणार असून ऑनलाईन पद्धतीने मतदान होणार आहे, सध्या शहरातून अनेक जण या शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी इच्छुक असून अनेकांनी यासाठी अर्ज दाखल केला आहे.शहर कॉंग्रेस एनएसयुआय चे गणेश डोंगरे यांच्यासह अनेकांनी अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे, त्यामुळे सोलापूर शहर युवक कॉंग्रेसची निवडणूक रंगतदार होणार आहे.
गणेश डोंगरे यांच्यासह विवेक कन्ना, झिशान सय्यद , सचिन वेरणेकर, आकाश गायकवाड, राजसाब शेख, अर्जुन साळवे, प्रशांत कांबळे, पवन दोडमनी, सचिन मानवी, सुशीलकुमार म्हेत्रे, प्रतीक अबुटे हे सुद्धा या शर्यतीत असणार आहेत, तर या निवडणुकीत वयोमर्यादा असल्याने अंबादास करगुळे व विनोद भोसले यांना या निवडणुकीत अर्ज दाखल करता येणार नाहीत, त्यामुळे यंदा सर्व नवीन चेहरे असून कोण गुलाल उधळनार याकड़े सर्वांचे लक्ष लागले आहे.