No Result
View All Result
प्रशासक संदीप कोहिनकर मांडणार अंदाजपत्रक
- सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील स्वउत्पन्नाचे सन 2022-23 चे सुधारित व सन 2023-24 चे मूळ अंदाजपत्रक मंजूरीसाठी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 13 मार्च 2023 रोजी दुपारी 2 वाजता होणाऱ्या जिल्हा परिषद विशेष सर्वसाधारण सभेत सादर होणार आहे. अशी माहिती सीईओ संदीप कोहिनकर यांनी दिली.
- मार्च 2022 मध्ये माजी अर्थ व बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे यांनी सेस फंडातील 42 कोटींचे बजेट सादर केले होते. तेव्हापासून आजपर्यंत जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्त आहे. यंदाही 42 कोटींच्या बजेटची शक्यता आहे. मागील काही वर्षांपासून सेस फंडामध्ये घट होत चालल्याचे चित्र आहे. सेस फंड किंवा उत्पन्न वाढीसाठी तितका प्रयत्न होताना दिसत नाही.
- समाज कल्याण, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण या विभागात वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत. परंतु समाज कल्याणमध्ये अद्यापही खरेदी झाली नसल्याने निधी अखर्ची पडून आहे. केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकार आणि नंतर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मांडण्याची आतापर्यंतची पद्धत आहे. राज्याचा अर्थसंकल्प मार्चच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाणार आहे. त्यानंतर ‘झेडपी’चा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. प्रशासन या अर्थसंकल्पात जिल्ह्यातील ग्रामीण जनतेसाठी कोणत्या योजना ठेवणार आणि कोणत्या योजनेतून जनतेला खूश करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
No Result
View All Result