सोलापूर – प्रतीवर्षाप्रमाणे सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलातील मराठी व इंग्रजी माध्यमाचा निकाल 100% लागला असून मराठी माध्यमातून हिना अमीन सय्यद या विदयार्थीनीने 94.40% गुण प्राप्त करून प्रशालेतून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला तर शाहीन जमादार हिने 92.80 गुण मिळवून प्रशालेतून द्वितीय येण्याचा मान मिळविला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. संजीवसा बिद्री, शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री. राजुसा भुमकर यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
शाळेतील तज्ञ शिक्षक वर्ग व संस्थेचे पदाधिकारी यांनी केलेल्या उत्कृष्ठ मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याचे मत प्रथम आलेली विद्यार्थिनी हिना सय्यद हिने व्यक्त केले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव श्री. जयकुमार कोल्हापुरे, शैक्षणिक संस्थेचे सचिव श्री. गजानन गोयल, संस्थेचे पदाधिकारी सदस्य भरतकुमार शालगर,श्रीरामसा पवार, सुरेश बिद्री, गणेश दामजी, संजीव रंगरेज, शिरीष कोल्हापुरे यांच्यासह प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. भगवंत उमदीकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजुषा काशीद, इंग्रजी विभागाचे मुख्याध्यापक डॉ. विष्णू रंगरेज आदि उपस्थित होते.यंदाच्या वर्षी एकूण 79 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून विशेष प्रविण्यात 32,प्रथम श्रेणी 21, द्वितीय श्रेणी 24 तर 2 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले.
संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
प्रशालेतील प्रथम 5 विद्यार्थी पुढील प्रमाणे :-
हिना सय्यद 94.40%
शाहीन जमादार 92.80
दर्शनराजे माने 90.40
संकल्प स्वामी 89.40
ईशा पाटील 89.20