भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान सभेतील शेवटच्या भाषणाचे “देशाच्या लोकशाहीला असलेला धोका” या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमात प्रा. डॉ. किशोर जोगदंड सर यांनी सैंविधानिक मुल्य, लोकशाहीचे रक्षण यांचे महत्व प्रतिपादीत केले. पुढे अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ विचारवंत आदरणीय दत्ताजी गायकवाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानातील योगदान सद्यस्थितीत, लोकशाहीचे कमी होत असलेले महत्व, कल्याणकारी राज्याची संकल्पना या बद्दल आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाची प्रस्तावना, सुकांत वाघमारे, सुत्र संचालन राम बनसोडे तर आभार स्वप्नशील भडकुंभे यांनी मानले तसेच या कार्यक्रमास चंद्रशेखर खळसोडे, बाळासाहेब रणदिवे , गौतम सोनकांबळे, सूरज वाघमारे, महेश रासे यांनी परिश्रम घेतले.