सोलापूर : आज शुक्रवारी दुपारी सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलावात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. अंदाजे 30 ते 35 वर्षीय मृतदेह पाण्यामध्ये तरंगत असताना मिळून आला आहे.तलावातील पाण्यामधून मृतदेह बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला असून सदर इसमाच्या हातावर अक्षय आणि मुकेश असे गोंदवले आहे. घटनास्थळी सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाले असून मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही,सदर इसमास कोणी ओळखत असेल तर सदर बझार पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सदर बझार पोलिस ठाणेच्या वतीने करण्यात आले आहे.