सोलापूर गुजराती मित्र मंडळ आयोजित
सोलापूर : रविवार दिनांक ३० जानेवारी रोजी सकाळी गुजरात भवन येथे आयोजित या व्याख्यानात वृज पटेल यांनी आयएएस , आयपीएस , आईआरएस आदी स्पर्धापरीक्षा विषयी मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानात त्यांनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी ज्ञानाचा लाभ देशहितासाठी द्यावा , त्यातून देश मोठा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली पैसे नसेल तर प्रामाणिक आणि हुशार मुलांना स्पर्धात्मक जगात पाऊल टाकता येत नाही आणि गुणवत्ता वाया जाऊ द्यायची नाही असे व्रज पटेल यांनी प्रतिपादन केले. चांगले प्रशासकीय अधिकारी तयार होणे हे ध्येय ठेऊन कार्य सुरु ठेवले आहे.
प्रारंभी मंडळाचे सचिव जयेश पटेल यांनी स्वागत केले तर युवा फोरमचे सचिव मयूर जगाणी यांनी आभार प्रदर्शन केले. युवा फोरमचे अध्यक्ष धर्मेश राडिया यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली, अक्षय जव्हेरी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास कांती पटेल, भरत शाह, केशवजी राम्भीया, विजय पटेल, केतन शाह, अमर धरमशी, मितेश पंचमीया सह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.