जलपर्णी काढली … गाळ उपसणे सुरू…
सोलापूर : सोलापूर शहरालगत विजापूर रोड वर असलेला छत्रपती संभाजी तलाव म्हणजेच कंबर तलाव लवकरच एक पर्यटन केंद्र बनणार आहे .केंद्राच्या राष्ट्रीय तलाव सुधारणा योजनेतून या तलावातील जलपर्णी काढणे आणि गाळ काढणे यासाठी 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे सोलापूर महापालिकेने या तलावाचे काम सुरू केले आहे. तामिळनाडूच्या सेफवे ड्रेजिग या कंपनीला हे सुमारे साडेआठ कोटीचे काम मिळाले आहे आजवर जलपर्णी पूर्णपणे काढण्यात आली असून सध्या या तलावातील गाळ उपसण्याचे काम जोमाने सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी या तलावातील गाळ काढणे गरजेचे आहे मात्र या परिसरातील काही लोक दमदाटी करत असून कंपनीला काम करणे मुश्किल झाले आहे तरी महापालिका प्रशासनाने तसेच सुज्ञ नागरिकांनी या सौंदर्य स्थळाच्या विकासासाठी पुढे येणे गरजेचे आहे.