येस न्युज मराठी नेटवर्क :कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यात आलेली असून, केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांकडे आता किती कांदा उपलब्ध आहे हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. कांद्याच्या निर्यातीवर केंद्रानं बंदी घातली होती. अखेर ती बंदी उठवण्यात आलीय. 1 जानेवारी 2021 नंतर कांद्यावर कोणतीही बंदी असणार नाही.
केंद्र सरकारच्या या निर्णयावर शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी टीकास्त्र सोडले होते. अखेर केंद्रानं हा निर्णय मागे घेतला आहे. ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारनं कांदा साठवणुकीवर मर्यादा घातली होती. केंद्रानं हा निर्णय 23 ऑक्टोबरला घेतला होता. सरकारनं किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांवर कांदा साठवणुकीवर मर्यादा घातली होती. किरकोळ व्यापारी 2 टन कांदा साठवू शकतात, तर ठोक व्यापारी 25 टनांपर्यंत कांदा साठवून ठेवू शकतात, अशासुद्धा अटी घातल्या होत्या.