सोलापूर : भारतरत्न इंदिरा नगर येथे रस्त्यावर गप्पा मारणाऱ्या मुलांना हटकल्यानंतर ऋषिकेश देडे याने बियरच्या बाटली ने बसवराज करजगी यांचा भाऊ सचिन यास डोक्यात दुखापत केली आहे. बसवराज करजगी यांनी याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे . ८ एप्रिल रोजी सायंकाळी सातच्या सुमारास यांच्या घराजवळ ऋषिकेश देडे , अनिकेश देडे,अक्षय बुरला आणि इम्रान इनामदार असे जोरात गप्पा मारत उभे होते .करजगी यांच्या आई-वडिलांनी या तरुणांना या ठिकाणी थांबू नका, आपापल्या घरी जा असे बजावल्यानंतर ही मारामारी झाल्याचे सांगण्यात आले. सदर बाजार पोलीस ठाण्याचे हवालदार काळे याप्रकरणी तपास करीत आहेत.