मोहोळ तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा
येस न्युज मराठी नेटवर्क : शरद पवार यांच्या मुबंई येथील सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवार रोजी मोहोळ तहसील कार्यालयावर आ. यशवंत माने यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील,राष्ट्रवादी कॉग्रेस तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे,सोलापूर जिल्हा दुध संघाचे व्हा.चेअरमन दीपक माळी, महिला अध्यक्षा सिंधुताई वाघमारे सह जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक,सर्व नगरसेवक सह राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देवून दोषीवर कडक करावी अशी मागणी करून निषेध व्यक्त केला.