वर्षा निवासस्थानी पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांची बैठक झाली, त्यावेळी मी आपणाकडे सोलापुरात उद्योग(MIDC) क्षेत्रातून आयटी पार्क मंजूर करण्यासाठी मागणी केली होती. यासंदर्भात आपणास १५ जुलै २०२५ रोजी लेखी निवेदन सुद्धा दिले होते.
आज सोलापुरात संपन्न झालेल्या कार्यक्रमात आपण एमआयडीसी (उद्योग) विभागाच्या माध्यमातून आयटी पार्क देण्याची घोषणा केली. सोलापूरच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत क्रांतिकारक ठरणारा आहे. सोलापूरच्या तरुणांच्या हाताला सोलापुरात काम मिळेल, सोलापूरचा उद्योग व्यवसाय भरभराटीला येईल आणि या निर्णयामुळे सोलापूरची सर्वांगीण प्रगती साधली जाईल.
साहेब, आजच्या आपल्या घोषणेमुळे माझ्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचा आनंद होतोय. आपले त्रिवार हार्दिक आभार !