सोलापूर : चॅप्टर केस करून अटक न करता सोडून देण्यासाठी विजापुर नाका येथील सैफुल पोलीस चौकीचे पोलीस हवालदाराने खाजगी इसमा करवी दहा हजाराची लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली आहे. यातील आरोपी पोलीस हवालदार किरण देविदास म्हेत्रे, यांनी तक्रारदार यांचे व त्यांचा मामे भाऊ यांचेविरुध्द विजापूर नाका पोलीस ठाणे येथे आयपीसी कलम ३२५ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे सांगून जर गुन्हयात तक्रारदार यांना अटक न करता, फक्त चॅप्टर केस करून तक्रारदार यांना सोडून देण्यासाठी खाजगी इसम रोहित नागेश गवड यांचे करवी तक्रारदार यांचेकडे २५००० रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती १०००० रुपये लाच रक्कम पोह किरण देविदास म्हेत्रे यांनी स्विकारण्याचे मान्य केले.
लाच रक्कम खाजगी इसम रोहित नागेश गवड यांचे हस्ते स्विकारली असल्याने दोन्ही आरोपीस ताब्यात घेवून जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. गणेश कुंभार, पोलीस उपअधीक्षक, उमांकांत महाडिक, पोलीस निरीक्षक, लाप्रवि,सोलापूर. सापळा पथक पोलीस अंमलदार पोह शिरीषकुमार सोनवणे, पोहवा श्रीराम घुगे, पोह अतुल घाडगे पोशि रवि हाटखिने, चालक पोह राहुल गायकवाड सर्व नेमणूक अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.