येस न्युज मराठी नेटवर्क : ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वाद काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. आता तर राज्यपालांच्या विमान प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली. त्यामुळे यावरुन भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तांत्रिक कारणामुळं परवानगी नाकारली असावी असं म्हटलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद आलाच नाही. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आणखी गडद होताना दिसत आहे.