कोल्हापूर येथे घडलेल्या घटनेचा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत खंडन करण्यात आले आहे; तर याच प्रकरणी परीक्षेच्या दिवशीच म्हणजे 23 नोव्हेंबरला कोल्हापुरात पोलिसांनी टी ई टी चा पेपर फोडण्याच्या तयारीत असलेल्या आणि तीन लाखात पेपर देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला.

परंतु पोलिसांच्या या कारवाईचे खंडन केलेले परीक्षा परिषद खोटे बोलत आहे, की पोलिसांची कारवाई खोटी आहे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
कोल्हापूरच्या या घटनेवरून सध्या महाराष्ट्र शासनाची ही परीक्षा परिषद आणि पोलीस प्रशासन यांच्यातच सामना रंगल्याचे दिसून येत आहे.
खरे काय? खोटे काय? हे संपूर्ण राज्याला समजणे गरजेचे असून या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा निर्धार पोलिसांनी केला असून याबाबत प्रामाणिकपणे टीईटीची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
आज पर्यंत अशा घटनेचा इतिहास पाहता ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ असे घडू नये अशी अपेक्षा या प्रामाणिक परीक्षार्थींनी व्यक्त केली आहे.

