23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी सुरू असलेल्या तपासात पोलिसांना महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. परीक्षेत येणारे 30 संभाव्य प्रश्न एजंट कडून मिळाले होते अशी कबुली दहा विद्यार्थ्यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांसह काही शिक्षक आणि एजंट अशा एकूण 61 जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. पेपर फुटीत काही संस्थाचालकांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांनी दिली. अटकेतील संशयतांनी TET सोबत सेटचाही पेपर फोडल्याची माहिती चौकशीतून समोर येत आहे. यात काही नामांकित शिक्षण संस्थांमधील प्राध्यापकांचा समावेश आहे. सेट परीक्षेचे प्रश्न मिळवून पात्र ठरलेल्या काही उमेदवारांची नावे पोलिसांना मिळाली आहेत. या रॅकेटमध्ये काही संस्थाचालकांचा सहभाग असल्याची माहिती तपासातून समोर येत आहे.

