येस न्युज मराठी नेटवर्क : ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता आरटीओ ऑफिस मध्ये चकरा माराव्या लागणार नाहीत सरकारने संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केली आहे . आता सरकार आणखी एक बदल करीत असून वाहन चालवण्यासाठी कुणालाही ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज यापुढे नाही. ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर वरून जर प्रशिक्षण घेतले असेल तर ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करताना टेस्ट द्यावी लागणार नसल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.