जम्मू काश्मीरमध्येजम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या समूहावर हल्ला केला असून त्यामध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम परिसरात हा हल्ला करण्यात आला असून त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक पोहोचले आहेत. महत्त्वाचं म्हणजे अमरनाथ यात्रेला काही दिवसात सुरूवात होत असतानाच हा हल्ला झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
ज्या पर्यटकांवर हल्ला झाला ते पर्यटक हे राजस्थानचे असल्याची माहिती आहे. जखमी पर्यटकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला आहे त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी शोध मोहीम सुरू केली आहे.