No Result
View All Result
- सोलापूर: सोलापूरहून पुण्याकडे भरधाव येणार्या ट्रॅव्हल्स बसने ओव्हरटेक करताना ट्रकला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून 17 जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोलापूर -पुणे महामार्गावर यवत येथे पहाटे सव्वा पाच वाजता घडला. मयतामध्ये एका पोलीस कर्मचार्याचा समावेश आहे तर जखमीमध्ये देखील एका पोलिस कर्मचाऱ्याचा आणि त्याच्या पत्नीचा समावेश आहे.
- पोलीस कर्मचारी नितीन दिलीप शिंदे (वय ३६), अमर मानतेश कलशेट्टी (वय २०), गणपत मलप्पा पाटील (वय ५५), आरती बिराजदार (वय २५) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. अक्षय चव्हाण, पोलीस कर्मचारी ,बसवराज गणप्पा गजा, त्यांची पत्नी सोनाली बसवराज गजा यांचा जखमीमध्ये समावेश आहे.
याबाबतची माहिती अशी, सोलापूरहून एक खासगी ट्रॅव्हल बस पुण्याकडे येत होती. सर्व प्रवासी झोपेत असताना पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास माणगावजवळील सीएनजी पंपासमोर बस पुढे जाणार्या ट्रकला ओव्हरटेक करत होती. त्यात चालकाचा अंदाज चुकला व तिने जोरात ट्रकला मागून धडक दिली. त्यात बसची एक बाजू पूर्णपणे फाटली आहे. या अपघातात चालकही जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस व यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून उपचार चालू आहेत.
- पोलीस कर्मचारी नितीन दिलीप शिंदे हे पुण्यातील भरोसा सेलमध्ये कार्यरत होते. तर बसवराज गजा हे लष्कर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. नितीन शिंदे हे पुण्याहून सोलापूर येथे बदली झालेल्या एका पोलिस निरीक्षकास पुण्याहून सोलापूर येथे सोडण्यासाठी गेले होते. परत येताना त्यांचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
No Result
View All Result