येस न्युज मराठी नेटवर्क : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त काल शरद पवारांनी जे भाषण केलं या भाषणातून अनेक वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत पवार आणि शिवसेनेवर स्तुतीसुमने उधळली त्यामुळे आगामी लोकसभा विधानसभा तसेच महापालिका निवडणुका राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढणार असेच संकेत या भाषणातून दिले आहेत. महाविकास आघाडी भक्कम आहे. पाच वर्ष या सरकारला धक्का लागणार नाही शिवसेना हा दिलेला शब्द पाळणारा पक्ष आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बंद खोलीत बैठक झाली यावरून सुरू झालेल्या उलट-सुलट चर्चेला शरद पवारांनी पूर्णविराम दिला. पवारांच्या अशा खेळीमुळे भाजप नेते टेन्शनमध्ये आले आहेत.