येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहरातील सिद्धेश्वर कारखान्याची बेकायदेशीर चिमणी पाडकामासाठी चौघांनी निविदा भरल्या असून या निविदा शुक्रवारी उघडण्यात आल्या यामध्ये सोलापूरच्या तिघांनी तर बाहेरच्या एका व्यक्तीने टेंडर भरले आहे.या मध्ये रेहान ट्रेडर्स; बिनियास कॉन्टॅक्ट प्रायव्हेट लिमिटेड, मल्लिकार्जुन वस्त्रद शालिमार कन्स्ट्रक्शन या चौघांचा समावेश आहेत. या चौघांनी टेंडर बसले असले तरी यामध्ये काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी चौघांनाही पत्र पाठविणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकारी लक्ष्मण चलवादी यांनी दिली त्यामुळे अद्याप पाडकामाची वर्कऑर्डर देण्यात आली नाही.