आषाढी यात्रा आढावा बैठक
सोलापूर – मुख्यमंत्री यांचे सुचनेनुसार पालखी मार्गांवर ३ किलोमीटर वर आसरा तयार करणेत येणार आहे. शासनाकडे पालखी मार्गावरील ग्रामपंचायती साठी ३ कोटी १५ लक्ष रूपये निधीची मागणी करणेच आली आहे. हरित वारीत दहा हजार वृक्ष लागवड करणेत येणार आहेत. निर्मल वारी अंतर्गत सात हजार तात्पुरती शौचालय सुविधा देणेत येत असल्याची माहिती आज जिल्हा पकिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
जिल्हा परिषदेस मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निजी कक्षात आज पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीचे गटविकास अधिकारी व सरपंच व ग्रामसेवक यांचे बैठकीचे आयोजन करणेत आले आहे. या बैठकीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, उत्तर सोलापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पाटील , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, समन्वयक वैभव आहाळे, प्रमुख उपस्थित होते.
स्वच्छ वारी निर्मल वारी,
या उपक्रमा अंतर्गत सोलापूर जिल्हात पालखी सोहळा आलेनंतर महिला वारकरी यांचे साठी सुविधा देणेत येत आहेत.
पालखी मार्गांवर हरिकणी कक्ष उभारणेत येत आहेत. आरोग्य विभाग यांचे वतीने पालखी मार्गांवर विश्रांती ( पालखी विसावा) व मुक्कामाचे ठिकाणी वैद्यक कक्षाचे शेजारी हिरकणी कक्ष उभारणेत येत आहे.
पालखी मार्गांवर आसरा, पाणी व स्वच्छता सुविधा
मुख्यमंत्री यांनी दिलेले सुचनेनुसार हरित वारी अंतर्गत वृक्षारोपण व वारकरी यांना उन्हापासून संरक्षण मिळणे साठी आसरा उभारणेत येणार आहे. स्वच्छता व शुध्द पाणी व पालखी मार्ग कचरा मुक्त करणे साठी च्या सुचना सिईओ दिलीप स्वानी यांनी दिल्या.
महिलांसाठी खास सुविघा – सिईओ स्वामी
मासिक पाळी व्यवस्थापन अंतर्गत महिलांसाठी सुविधा देणेत येत असून महिला साठी सॅनिटरी नॅपकिन सुविघा आरोग्य विभागाचे वतीने पुरविणेत येत आहे.
फिरते चित्ररथ यांचे द्वारा सॅनिटरी नॅमकीन ठेवणे साठी व्हेडींग मशीन व हिरकणी कक्षाचे बाजूस इन्सीनेटर सुविघा देणेत येत आहे.
तात्पुरती शौचालय सुविधा-
महिला वारकरी यांचे साठी मुक्कामाचे ठिकाणी ठेवणेत आलेले १ हजार शौचालया मधील ४० टक्के शौचालय महिला साठी राखीव ठेवणेत येत आहेत.
शौचालया साठी दिशा दर्शक फलक, महिलांचे स्टिकर, शौचालय सुविघा असलेला नकाशा, मासिक पाळीचे वेळी चेजींग रूम ची सुविघा या ठिकाणी देणेत येत आहेत. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
यंदाच्या वारीतही प्लास्टीक व्यवस्थापन – सिईओ स्वामी
हरित वारी अंतर्गत पर्यावरण
गुरसाळे व भटुंबरे हद्दीत वारकरी तळ -कोहिणकर
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुचविले प्रमाणे शहरातील गर्दी कमी करणे साठी गुरसाळे व भटुंबरे हद्दीत वारकरी तळ करणेत येत आहे. या मार्गांवर चार दिवसाचे कालावधी जादा शौचालयाची मागणी करणेत आली असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी सांगित
पालखी तळाची स्वच्छता सुधारणा करा – शेळकंदे
पालखी तळ व परिसराची स्वच्छता ठेवा. आरोग्य विभागा अंतर्गत पाणी स्त्रोताचे सर्वेक्षण, पाणी नमुणे तपासणी, अशुद्ध पाणी नमुने स्त्रोताची फेर तपासणी, टॅंकर भरणा ठिकाणाचे शुध्दीकरण, टॅंकर तपासणी, टॅंकरवर स्टीकर लावणे, या साठी कालवधी आखून दिला असून माळशिरस व पंढरपूर तालुक्यांसाठी कार्सवाही करणे साठी कालावधी निश्चित करून देणेत आला आहे. पालखी तळावर सुरक्षिततेसाठी बांबुचे सुरक्षा कठडे करा. नियोजनात या बाबींचा समावेश करा. असे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सांगितले.
ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गांवर पाच हजार तात्पुरती शौचालये उपलब्ध करून देणेत येत संत मुक्ता बाई महाराज व संत गजानन महाराज व संत एकनाथ महाराज व संत एकनाथ महाराज पालखी सोहळा मार्गांवर वारकरी यांचे साठी जादा शौचालयाची मागणी करणेत आली आहे.