सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी तेलगू देशम पार्टीने भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना पाठिंबा जाहीर केला. याबाबतचे पत्र तेलुगु देशम पार्टीचे अध्यक्ष गणेरी तिप्पण्णा आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उमेदवार देवेंद्र कोठे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
तेलगू देशम पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच आंध्र प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांची भेट घेऊन सोलापूरच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली केली. शहर मध्य विधानसभा मतदारसंघात तेलुगु भाषिक उमेदवार असल्याने त्यांना पक्षाचा पाठिंबा द्यावा, अशी मागणी यावेळी तेलगू देशम पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याकडे केली होती. यावेळी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना पाठिंबा देण्यास मान्यता दिली. त्यानुसार सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात देवेंद्र कोठे यांना पक्षातर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला. देवेंद्र कोठे यांच्या महाविजयासाठी तेलगू देशम पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी सांगितले.
यावेळी अध्यक्ष गणेरी तिप्पण्णा, इंजामुरी जनार्दन, पोटू रामुलू, श्रीनिवास गोसकी, चीनाराजु तिप्पण्णा, श्रीनिवास गनेरी, नागनाथ अक्कल, शंकर देवरकोंडा, नरसिंह कनकी, श्रीनिवास नंदाल, बालकृष्ण मादम आदी टीडीपीचे पदाधिकारी उपस्थित होते.