मुंबई : तेलंगणाच्या भारत राष्ट्र समिती पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रात पाय रोवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यातील तब्बल 2 हजार 359 ग्रामपंचायतीचा निकाल समोर येत आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यासह आता बीआरएस पक्षालाही ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाला महाराष्ट्रातील दहा ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळला आहे. भंडाऱ्यातील नऊ ग्रामपंचायतीवर बीआरएस पक्षाने झेंडा रोवला आहे. तर बीडमधील रेवती देवकी ग्रामपंचायतही ताब्यात आली आहे.
भंडाऱ्यातील नऊ ग्रामपंचायतीवर बीआरएसचा झेंडा
भंडारा जिल्ह्यातील ६६ पैकी २० ग्रामपंचायतीचा निकाल समोर आला आहे. भंडाऱ्यात आतापर्यंत बीआरएस पक्षाने बाजी मारली आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीला पक्षाडत बीआरएस पक्षानं आतापर्यंत भंडाऱ्यातील 9 ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावला आहे. भाजप आणि काँग्रेस पक्षाला आतापर्यंत दोन दोन ग्रामपंचयतीमध्ये विजय मिळवता आलाय. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एका ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळलाय.