सांस्कृतिकदृष्ट्या एक समृद्ध राज्य म्हणून आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक यांसह राज्यातली राजकीय कार्यसंस्कृती सुद्धा समृद्ध आहे. या कार्यसंस्कृतीची समृद्धी वाढवण्याकरता राज्य शासनाचा सामान्य प्रशासन विभाग तसंच अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं मोलाचं योगदान राहिलं आहे.
राज्यातल्या शासकीय, निम-शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्वच संघटनांनी नेहमीच राज्यातली कार्यसंस्कृती रुजवण्यात अतिशय मोठी भूमिका बजावली आहे. आपल्या राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीनं आयोजित ‘Tech वारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून राज्याच्या कार्यसंस्कृतीची पाळमुळं खोलवर रुजतील आणि राज्याचं मनुष्यबळ अधिक तंत्र कुशल, गतिमान, पारदर्शक, जबाबदार होईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
‘Tech वारी’ चं व्याख्यांक तसंच कार्यक्रमाची निवड करताना श्रीमती व्ही. राधा आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं शासकीय कर्मचाऱ्यांच्या तंत्र कुशलतेवर भर देत असताना त्यांचा आहार कसा व्यवस्थित राहील, त्यांची मानसिक स्थिती कशी चांगली राहील, याचा देखील विचार या ठिकाणी केला आहे. याबद्दल अजित पवार यांनी कौतुक केले.