सोलापूर रोटरी परिवार समूहातर्फे 200 शाळांना तसेच ग्रंथालयाची भेट
आंतरराष्ट्रीय रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 च्या प्रांतपाल रोटेरियन स्वाती हेरकल यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर रोटरी परिवार समूह (कॉप्स) च्या वतीने, विद्यार्थ्यांमधील वाचनाची गोडी वाढावी म्हणून अत्यंत महत्त्वाकांक्षी असा परिवर्तन प्रकल्प विदया अंतर्गत ‘रोटरी की पाठशाला’हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या मध्ये 1000 शाळांना ग्रंथालय भेट दिली जाणार आहेत. याचाच एक भाग म्हणून सोलापूर रोटरी परिवाराकडून सोलापूर शहर व परिसरातील तब्बल 200 शाळांना ग्रंथालय भेट करण्यात आले. ज्यामध्ये प्रत्येक शाळेत एक मजबूत असे लोखंडी कपाट व त्यामध्ये अत्यंत वाचनीय अश्या व वाचनाची गोडी वाढवणाऱ्या पुस्तकांचा संच देण्यात आला.
यासाठी कालिका स्टील, जालनाचा सीएसआर निधी आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे सहकार्य लाभले. हा भव्य वितरणाचा कार्यक्रम 16 मार्च 2024 रोजी दुपारी 4 वाजता चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला, विकास नगर, सोलापूरच्या प्रांगणात संपन्न झाला. प्रांतपाल रोटे स्वाती हेरकल प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होत्या. याशिवाय प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध उद्योजक राम रेड्डी व ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश यलगुलवार सर उपस्थित होते. सर्व शाळांचे मुख्याध्यापक व त्यांचे प्रतिनिधी रोटरी परिवारात समूहातील सर्व सदस्य देखील मोठ्या संख्यने उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना स्वाती हेरकल यांनी डिजिटल माध्यमांचा अतिवापर कमी करून पुस्तकांची आणि वाचनाची गोडी लागणे आवश्यक आहे हे नमूद केले, शिवाय रोटरीच्या विविध समाजउपयोगी कार्याची माहिती सर्वांना दिली. रोटरी सारखी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या संस्थेने कंपन्यांच्या सीएसआर चा मोठ्या प्रमाणात वापर करावा असे प्रमुख पाहुणे राम रेड्डी यांनी सांगितले.
अतिथींचे स्वागत सोलापूर रोटरी समूहाच्या अध्यक्षा रोटे. ज्योती चिडगुपकर यांनी केले व प्रस्तावना रोटरीचे माजी अध्यक्ष रोटे. जयेश पटेल यांनी केले. आभार सचिव रोटे. माऊली झांबरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरिअन अविनाश मठपती यांनी केले.
या प्रसंगी निर्मला मठपती फाउंडेशनने 1000 पुस्तके ‘रोटरी की पाठशाला’ या उपक्रमास भेट दिली, म्हणून संस्थचे अध्यक्ष उत्तरेश्वर मठपती यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात विविध रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे. जान्हवी माखिजा, रोटे स्वाती मनसावाले, रोटे आनंद लुणावत, रोटे व्यंकटेश सोमाणी, रोटे चार्वाक बुरगुल, रोटे नंदकुमार आरध्ये, रोटे महेश साळुंखे, रोटे अविनाश मठपती उपस्थित होते. याशिवाय डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रोटे. प्रमोद शिंदे, रोटे. दिपक बागडे, डिस्ट्रिक्ट टीआरएफ डायरेक्टर रोटे. नितीन कुदळे, पीडीजी रोटे.राजीव प्रधान, पीडीजी रोटे. झुबिन अमरिया, रोटे . जयेश पटेल,यलगुलवर प्रशालेचे सचिव शाशिभूषण यलगुलवार, डिस्ट्रिक्ट चेअर रोटे. सचिन चौधरी,सहाय्यक प्रांतपाल रोटे. राजन वोरा, रोटे अतुल चव्हाण, रोटे जितेंद्र जाजू देखील उपस्थित होते.