येस न्युज मराठी नेटवर्क : व्यक्तिगत कामासाठी वारंवार जिल्हापरिषदेच्या फेऱ्या मारणाऱ्या शिक्षकांना यापुढे लगाम बसणार आहे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार आता शिक्षकांना मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांची लेखी परवानगी घेतल्याशिवाय जिल्हा परिषदेत येता येणार नाही शिक्षक वैद्यकीय देयके आणि भविष्य निर्वाह निधी संदर्भात वारंवार जिल्हा परिषदेत येत असतात मात्र आता जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर दर सोमवारी प्राप्त मुलांची स्थिती दर्शविण्यात येणार आहे. यामुळे गतिमानता तर येणार आहेच परंतु कारभारात पारदर्शकता ही येईल असे स्वामी यांनी सांगितले .सध्या हा प्रयोग वैद्यकीय देयकाबाबत असला तरी जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांमध्ये हळूहळू लागू करणार असल्याचे स्वामी यांनी म्हटले आहे .
अपंग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जे कर्मचारी प्रयत्नशील असतात त्यांना देखील नियुक्ती अधिकाऱ्याची परवानगी घेतल्याशिवाय असे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सिव्हिल रुग्णालयात तपासणीसाठी जाता येणार नसल्याचे स्वामी यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.