सोलापूर – उच्चपदस्थ व्यक्तींनाही घडवितो तो शिक्षक. मग तो खेळाडूंना, अधिकाऱ्यांना,शास्त्रज्ञांना ,पोलिसांना, वाहनचालकांना, नर्तकांना, गायकांना अशा विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना घडवणारा शिक्षक हा खरोखरच नेशन बिल्डर च असतो हे रोटरी नॉर्थ ने समाजाला दाखवून दिले.
शिक्षक दिननिमित्ताने हा सोहळा रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ ने आयोजित केला होता.
यामध्ये सोलापुरातील बारा शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. स्मृतिचिन्ह , प्रशस्तीपत्रक आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार प्राप्त शिक्षक अनुक्रमे – प्रियांका मुंढे, विजयालक्ष्मी पिटालकर, काजल कुलकर्णी, स्मिता अनिखिंडी, सुवर्णा कट्टीमनी , संध्या गुमास्ते, मोमीन नासीर, तेजश्री टोणपे, सर्व भीकाजी कुलकर्णी, संतोष वाळवेकर, ज्ञानेश्वर पाटील, बाळासाहेब बिराजदार ,
हे पुरस्कार रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ चे अध्यक्षा डॉ जानवी माखीजा, क्लब चे सचिव स्वप्नील कोंडगुळे, संचालक दीपक आहुजा, राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयाचे सचिव सुनील दावडा, हिरालाल डागा, राजगोपाल झंवर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.
प्रारंभी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. क्लब चे सचिव स्वप्नील कोंडगुले यांनी रोटरी नॉर्थच्या सामाजिक कार्याची माहिती सांगितली. तसेच दीपक आहुजा यांनी
नेशन बिल्डर अवॉर्ड विषयी मनोगत व्यक्त केले. तर सुनील दावडा यांनी क्लब चालवीत असलेल्या मूकबधिर शाळा आणि अंधशाळा याविषयी माहिती दिली. या प्रसंगी रोटरियन जमादार मॅडम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार सुनील दावडा यांनी मानले तर सूत्रसंचालन स्वप्नील कोंडगुळे यांनी केले.
या कार्यक्रमास रोटरियन दौलत सीताफळे, सपकाळ, युगंधर जिंदे, डॉक्टर बाळासाहेब शितोळे, आरती गांधी, क्षितिजा गाताडे , प्राचार्य समेंद्र पाणीग्रही, बळीराम पावडे, देविदास मेढे , संजय चौगुले, मुकेश मेहता, दादा वाघमारे, डॉक्टर शिरशेट्टी, रेणुका पसपूले, आनंद पारेकर, गंगाधर मादभवी,साहेब गौडा पाटील, बलभीम साळुंके, स्वामिराव पिटाळकर, वर्षा चौगुले, अनिल पिटालकर,आदि उपस्थित होते.