सोलापूर : शिक्षक जयंत आमदार जयंतआसगावकर यांनी आज (रविवारी) सुट्टीच्या दिवशी सोलापूर शिक्षणाधिकारी सचिन जगताप आणि वेतन पथक अधीक्षक दीपक मुंढे यांच्यासमवेत शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आले होते. या बैठकीला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आमदार जयंत आसगावकर यांनी सुरुवातीला शिक्षणाधिकारी जगताप आणि वेतन पथक अधीक्षक मुंढे यांच्याकडून शिक्षण खात्यातील प्रलंबित कामाचा आढावा घेतला. प्रलंबित शालार्थ आयडी, विनाअनुदानितकडून अनुदानीतकडे बदली तसेच अनुकंप प्रस्तावाची कामे लवकरात लवकर निर्गमित करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षणाधिकारी यांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कामे कार्यालयात थांबून ती मार्गी लावण्यास सांगितले.
कामाला गती देण्याबरोबरच दिवसभर कार्यालयात थांबून प्रलंबित कामे मार्गी लावण्यास सांगितले. वेतन पथक अधीक्षकांना महिन्याच्या एक तारखेला पगार करण्यास सांगितले. निधीची कमतरता असल्यास पुणे स्तरावर अधिकाऱ्यांना सांगून जादा निधीची तरतूद केली जाईल. काही शिक्षक बांधवांनी शिक्षणाधिकारी व वेतन पथक स्तरावरील आपले वैयक्तिक प्रश्न घेऊन या बैठकीत सहभागी झाले होते. हे प्रश्न देखील आमदार जयंत आसगावकर यांनी मार्गी लावले. अधिकाऱ्यांनी शिक्षकांना सन्मानाची वागणूक द्यावी, त्यांची कामे तात्काळ मार्गी लावावीत, अशा सक्त सूचनाही आमदार जयंत आसगावकर यांनी यावेळी दिल्या.
यावेळी शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत असगावकर ,जिल्हा परिषदचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, संपर्कप्रमुख श्रावण बिराजदार, संघटनेचे अध्यक्ष कृष्णदेव बेहेरे रामचंद्र जानकर आश्रम शाळा संघटनेचे अध्यक्ष महेश सरवदे , वेतन पथकाचे अधीक्षक दिपक मुंडे, आदि शिक्षक मान्यवर उपस्थित होते