येस न्युज मराठी नेटवर्क । मुंबईतील एका पाच महिन्यांच्या बालिकेच्या उपचारासाठी आवश्यक औषधी अमेरिकेतून आयात करण्यासाठी लागणारे सर्व कर माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहेत. तातडीने हा निर्णय घेतल्याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानले आहेत. यासंदर्भात माहिती फडणवीस यांनी पत्राचा फोटो पोस्ट करत दिली आहे.
तिरा कामत या मुंबईतील पाच महिन्यांची बालिकेला जीन रिप्लेसमेंट उपचारांची नितांत गरज आहे. तिच्या या उपचारांसाठी लोकांनी क्राऊड फंडींगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. क्राऊड फंडींगच्या माध्यमातून सुमारे १६ कोटी रूपये गोळा करण्यात आले आहेत. पुढील उपचारासाठी ‘झोलजेन्स्मा’ हे औषध अमेरिकेतून भारतामध्ये आयात करावे लागणार होते. मात्र हे औषध भारतात आणण्यासाठी जीएसटी, कस्टम करांसह सुमारे साडेसहा कोटी रूपये आणखी खर्च येणार होता. त्यामुळे पालकांनी त्यातून सूट मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला.