सोलापूर : नागपूर येथील प्रभावती सबाने यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ताराबाई शिंदे सामाजिक कार्य पुरस्कार लेखक समीर गायकवाड यांना जाहीर झाला. दरवर्षी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सामाजिक कार्य करणाऱ्या एका कार्यकर्त्यास हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी ताराबाई शिंदे सामाजिक कार्य पुरस्कारासाठी ‘खुलूस’कार सोलापूरचे लेखक समीर गायकवाड यांची निवड करण्यात आली. वेश्या व्यवसायातील स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा यासाठी समीर गायकवाड हे सतत प्रयत्नशील आहेत.
साहित्य निर्मिती करत असतानाच ते सामाजिक जाणिवांतून विविध घटनांवर पोटतिडकीने परखड भाष्य करतात. रेड लाईट डायरीज् खुलूस आणि झांबळ ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत पुरस्कारासाठी समीर गायकवाड यांची निवड करण्यात र आली.