सोलापूर : नवोदय विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी तनिष्का सुरवसे हिची महिलांच्या खुल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातून निवड झाली आहे. अग्रवाल समाज प्रायोजित अग्रसेन महाराज जयंती निमित्त बार्शी येथे आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत तनिष्का चेस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले. यामध्ये तनिष्का सुरवसे हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून स्मृतिचिन्ह देऊन तिचा गौरव करण्यात आला. तसेच अकरा वर्षाखालील गटात अपूर्वा सुरवसे तर अकरा वर्षाखालील वयोगटात सोहम कुटे याचा सन्मान करण्यात आला. तनिष्का चेस अकॅडमीचे संस्थापक रमेश्वर सुरवसे यांनी या सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.