शिवाजी सुरवसे / सोलापूर : कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर तानाजी सावंत काल प्रथमच सोलापुरात आले. कार्यकर्त्यांचा फौज फाटा.. बोलण्याची आक्रमक शैली… डझनावर कार्यक्रम… ठिकठिकाणी डिजिटल बोर्ड…क्रेन द्वारे घालण्यात आलेला हार यामुळे या दौऱ्याची उत्सुकता आणि त्याचे पडसाद दुसऱ्या दिवशी देखील पाहायला मिळाले. माळशिरस तालुक्यातील विविध आरोग्य केंद्रांना भेटी देऊन त्यांनी अधिकाऱ्यांना झापले तुम्ही नीट आरोग्य सेवा द्या नाहीतर मी तुमचे ऑपरेशन करेन असं वक्तव्य त्यांनी केलं. सोलापूर शहरात तब्बल पाच तास ते उशिरा आले. जुना पुना नाका येथे क्रेनच्या साह्याने त्यांना भला मोठा हार घालण्यात आला तर हेरिटेज सभागृहात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. लेझीम वर ठेका धरून त्यांनी कार्यकर्त्यांची मने जिंकली मात्र सिव्हिल हॉस्पिटल मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ताटकळत ठेवून रात्री साडेदहा वाजता अचानक मीटिंग रद्द केल्यामुळे सिव्हिल मधील अधिकारी कर्मचारी नाराज झाले. कधी नव्हे अशा पद्धतीने सात रस्ता येतील येथील शासकीय विश्रामगृह डिजिटल मध्ये नाहून निघाले होते. सोलापूरकरांनो 17 तारखेनंतर बघाच आमच्याकडे कसे इनकमिंग सुरू होते असं सांगून त्यांनी अनेक पक्षांना चिमटे काढले आहेत एकूणच त्यांचा हा दौरा चांगला गाजला त्यांच्या आक्रमक शैलीमुळे तेच सोलापूरचे पालकमंत्री होतील का हा प्रश्न मात्र कायम आहे