बहुप्रतिक्षित राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर मंगळवारी सकाळी पार पडला यामध्ये भाजपच्या नऊ आणि शिंदे गटाच्या नऊ आमदारांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली विशेष म्हणजे उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यावर वर्चस्व स्थापन करीत असलेल्या तानाजी सावंत यांना कॅबिनेट मंत्री पदाची शपथ देण्यात आली आहे त्यामुळे तेच सोलापूरचे पालकमंत्री होतील अशी चिन्हे आहेत. भाजपकडून सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, अक्कलकोटचे सचिन कल्याशेट्टी, माळशिरसचे आमदार राम सातपुते तसेच आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा होती मात्र भाजपने सोलापूर जिल्ह्याला पहिल्या 18 मंत्राच्या यादीत एकही स्थान दिले नाही. काय झाडी काय डोंगर या वाक्याने देशभर प्रसिद्धीच्या झोतात आलेले शिंदे गटाचे शिवसेनेचे सांगोलेतील आमदार शहाजी बापू पाटील यांना देखील मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आली आहे. भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मनगुंटीवार ,चंद्रकांत दादा पाटील ,विजयकुमार गावित, गिरीश महाजन, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण अतुल सावे आणि मंगल प्रसाद लोढा यांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील दादा भुसे संजय राठोड ,संदीपन भुमरे ,उदय सामंत ,तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आणि शंभुराजे देसाई या नऊ जणांना राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ दिली.