सोलापूर : शेतीचे साहित्य खरेदी करण्यासाठी सोलापुरात आले असताना संभाजी महाराज चौकात मराठा क्रांति आक्रोश मोर्चा असल्याने बरीच गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने एक लाख दहा हजार रुपयांची साडेचार तोळ्याची सोन्याची साखळी चोरल्याची फिर्याद सुरेश भानुदास अंबुरे या पंढरपूर तालुक्यातील बार्डी येथील शेतकऱ्याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलीस नाईक राठोड अधिक तपास करीत आहेत.